मुंबई – भाजपमधील दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा धक्कादायक खुलासा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासून भाजपमधील काहीजण आमच्याशी चर्चा करत आहेत. भाजपमध्ये त्यांना योग्य स्थान दिलं जात नसल्याने ते नाराज आहेत. ते सर्व आमदार राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक असून, लवकरच त्यांना पक्षप्रवेश होईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
COMMENTS