भाजप आमदाराचा पोलीस ठाण्यात राडा, उचलला महिला पोलिसावर हात, पाहा व्हिडीओ !

भाजप आमदाराचा पोलीस ठाण्यात राडा, उचलला महिला पोलिसावर हात, पाहा व्हिडीओ !

नवी दिल्ली –भाजप आमदारानं चक्क महिला पोलिसाला अरेरावीची भाषा करत त्यांच्यावर हात उचलला असल्याची घटना घडली आहे. उत्तराखंडमध्ये ही घटना घडली असून रुद्रपूर येथील भाजपचे आमदार राजकुमार ठुकराल यांनी हा पराक्रम केला आहे. याबाबतचा व्हिडीओ एएनआयनं व्हायरल केला आहे. या व्हिडीओमध्ये चिडलेले ठुकराल हे महिला पोलिसावर भडकले असल्याचं पहावयास मिळालं आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे पोलिस उपनिरीक्षक अनिता गौराला यांनी दोन जणांना ताब्यात घेतलं होतं. यावरुन राजकुमार ठुकराल हे या पोलिस महिलेवर भडकले असल्याची माहिती आहे.

दरम्यान पोलीस अधिकारी अनिता गौराला यांनी एका दुचाकीस्वाराला ताब्यात घेतलं. तसेच दुचाकीस्वार हा दारूच्या नसेत असल्यामुळे त्याला ताब्यात घेतलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. परंतु याबाबतची माहिती मिळताच आमदार साहेबांनी पोलीस ठाणे गाठलं आणि अनिता गौराला यांच्यावर भडकले. तसेच त्यांचा राग एवढा अनावर झाला की जोरजोराने ओरडत ते महिला पोलिसाच्या अंगावर गेले. परंतु त्यांच्या अंगावर हात उगारताच तेथील स्थानिकांनी त्यांना आवरतं घेतलं आणि मोठी घटना टळली.

 

COMMENTS