भाजपने ऐनवेळी विधान परिषदेचा उमेदवार बदलला, पंकजा मुंडेंच्या कट्टर समर्थकाला उमेदवारी!

भाजपने ऐनवेळी विधान परिषदेचा उमेदवार बदलला, पंकजा मुंडेंच्या कट्टर समर्थकाला उमेदवारी!

मुंबई – भाजपने ऐनवेळी विधान परिषदेचा उमेदवार बदलला असून भाजपने डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगून, पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना उमेदवारी दिली आहे. गोपछडे यांनी 8 मे रोजी आपला अर्ज भरला होता, तर काल शेवटच्या दिवशी रमेश कराड यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.

दरम्यान रमेश कराड हे पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक मानले जातात. कराड यांनी 2018 मध्ये बीड-उस्मानाबाद-लातूर या मतदारसंघातील विधान परिषदेच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अर्ज भरला होता. मात्र ऐनवेळी माघार घेऊन त्यांनी भाजपच्या सुरेश धस यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करुन विधान परिषदेचं तिकीट मिळवलं होतं. परंतु अवघ्या पाच दिवसात त्यांनी माघार घेत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करुन धनंजय मुंडे यांची मोठी अडचण केली होती. कारण त्यावेळी राष्ट्रवादीकडे उमेदवारच न उरल्याने, अपक्षाला पाठिंबा देण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली होती. त्यानंतर या निवडणुकीतही ऐनवेळी भाजपने रमेश कराड यांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे कराड यांची खेळी यशस्वी ठरली असल्याची चर्चा आहे.

COMMENTS