सोलापूर – भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा जातीचा दाखला नेमका आहे तरी कुठे असा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. कारण खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी आपला जातीचा दाखला हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. तर त्यांचा जातीचा दाखला उच्च न्यायलयात असल्याची माहिती खासदारांच्या वकीलांनी दिली आहे. त्यामुळे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा दाखला नेमका आहो तरी कुठे असा सवाल आता विचारला जात आहे.
दरम्यान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचा निर्णय सोलापूर जात पडताळणी समितीनं दिला होता. परंतु 9 फेब्रुवारी रोजी अक्कलकोट-सोलापूर प्रवासादरम्यान वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत जातीचा दाखला गहाळ झाल्याची तक्रार खासदार
जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पोलिसात नोंदवली आहे. 14 फेब्रुवारी रोजी खासदारांनीच ही तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे 15 फेब्रुवारी रोजीच सोलापूर जात पडताळणी समितीच्या कार्यालयात या प्रकरणावर सुनावणी सुरु असताना दाखला उच्च न्यायलयात असल्याची माहिती खासदारांच्या वकीलांनी दिली होती. त्यामुळे दाखला नेमकं आहे तरी कुठे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
COMMENTS