भाजप खासदाराचं ‘ते’ जॅकेट पाहून पंतप्रधान मोदी म्हणाले ‘लुकिंग गूड’ !

भाजप खासदाराचं ‘ते’ जॅकेट पाहून पंतप्रधान मोदी म्हणाले ‘लुकिंग गूड’ !

नवी दिल्ली – भाजप खासदारानं घातलेल्या जॅकेटचं कौतुक पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे. खासदार अनुराग ठाकूर यांनी संसद भवनामध्ये येताना एक जॅकेट घातले होते. त्या जॅकेटवर Namo again! असा संदेश लिहिण्यात आला होता. या जॅकेटमधील एक फोटो ठाकूर यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर टाकला होता.

त्यानंतर त्यांच्या या ट्विटवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नमो मर्चंडाईजने या संदर्भात केलेल्या ट्विटला रिट्विट करीत नरेंद्र मोदी यांनी अनुराग ठाकूर यांना मेन्शन करीत छान दिसत आहात (Looking Good), अशी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यामुळे या जॅकेटची चर्चा संसद भवनाबरोबरच देशभरात पहायला मिळत आहे. अनुराग ठाकूर यांच्या या ट्विटला इतरही अनेक राजकीय नेत्यांनी लाईक केले. त्याचबरोबर काही जणांनी त्यांच्याकडील जॅकेट घालून काढलेले फोटोही रिट्विट स्वरुपात अपडेट केले आहेत.

COMMENTS