मुंबई – भाजपला मोठा धक्का बसला असून लोकसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यामुळे विद्यमान खासदारानं भाजपला रामराम ठोकला आहे. दिल्लीतील उत्तर पश्चिम मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार उदित राज यांनी राजीनामा दिला आहे. या मतदारसंघातून भाजपने गायक हंसराज यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नाराज होऊन विद्यमान खासदार उदित राज यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान यावेळी दलितांसाठी आवाज उठवणे चुकीचे आहे का, असा प्रश्नही उदित राज यांनी विचारला आहे. उदित राज हे दलित समाजातील नेते आहे. भाजपाने मला तिकीट नाकारुन अन्याय केला आहे. मी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार नाही. पण भाजपाने मला पक्ष सोडण्यासाठी भाग पाडले असल्याचं उदित राज यांनी म्हटलं आहे.
तसेच २०१८ मध्ये अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांविरोधात दलित समाजाने बंदची हाक दिली होती. मी देखील या बदलांनाविरोध केला होता. यामुळेच पक्षातील वरिष्ठ नेते माझ्यावर नाराज झाले असावेत. मी मुद्दे उपस्थित करायला नको का?, मी यापुढेही दलित समाजाच्या हितासाठी आवाज उठवतच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS