माझी प्रकृती ठीक, हृदयविकाराच्या बातम्या चुकीच्या – भाजप खासदार

माझी प्रकृती ठीक, हृदयविकाराच्या बातम्या चुकीच्या – भाजप खासदार

अकोला – अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची चर्चा आहे. परंतु “माझी प्रकृती चांगली असून मानदुखीच्या त्रासामुळे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आलो होतो. हृदयविकाराच्या बातम्या चुकीच्या आहेत,” असं स्पष्टीकरण धोत्रे यांनी दिलं आहे. संजय धोत्रे यांचं तिकीट कापण्याच्या तणावातून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची चर्चा आहे मात्र त्यांनी स्पष्टीकरण दिलं असू हृदयविकाराच्या बातम्या चुकीच्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे हे जवळपास अडीच लाख मतांनी निवडून आले होते. मात्र अकोल्यात सध्या भाजप नेते रणजीत पाटील आणि संजय धोत्रे असे दोन गट भाजपमध्ये पडले आहेत. त्यामुळे विकासकामं रखडली आहेत. त्याचा ठपका संजय धोत्रेंवर ठेवला जात आहे. त्यामुळे संजय धोत्रे यांचं तिकीट कापणार असल्याची चर्चा अकोल्यात आहे. त्याच तणावातून त्यांना काल रात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु ही बातमी चुकीची असल्याचं धो‌त्रेंनी म्हटलं आहे.

COMMENTS