पुणे महापालिकेचा अचूक अंदाज व्यक्त केलेले भाजप खासदार म्हणतायेत गुजरातमध्ये भाजप हरणार !

पुणे महापालिकेचा अचूक अंदाज व्यक्त केलेले भाजप खासदार म्हणतायेत गुजरातमध्ये भाजप हरणार !

पुणे – पुणे महापालिका निवडणुकीत सर्व्हेक्षणकरुन भाजपा 92 जागा जिंकेल असं भाकित भाजपचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी केलं होतं. महापालिका निवडणुकीचा निकाल लागण्याच्या आधी त्यांचं भाकित फारस कुणी मनावर घेतलं नव्हतं. भाजपच्या शहरातल्या नेत्यांनाही तेंव्हा ते फारसं पटला नव्हता. भाजप एवढ्या जागा जिंकेल असंही त्यांना वाटत नव्हतं, ते खाजगीत तसं बोलूनही दाखव होते. मात्र जेंव्हा निकाल लागेल आणि भाजपला तब्बल 98 जागा मिळाल्या. तेंव्हा मात्र सगळीकडेच काकडे यांच्या अंदाजाची चर्चा सुरु झाली. ती एवढी की खाजगीमध्ये काकडे यांच्या अंदाजावर संशय घेण्याइतपत….

पुणे महापालिका निवडणुकीचा एकदम अचूक अंदाज व्यक्त केल्यानंतर आता त्यांनी गुजरात निवडणुकीच्या निकालाच्या अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या अंदाजानुरास यावेळी भाजपला गुजरातमध्ये पराभव स्विकारावा लागेल. अर्थात याहीवेळेलाही भाजपच्या पुण्यातील नेत्यांना तो मान्य नाही. काही सर्व्हेक्षणाच्या अंदाजानुसार त्यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार भाजपला 90 च्या आसपास जागा मिळतील असं त्यांनी सांगितलं आहे. आता पुण्याप्रमाणे गुजरातमध्येही त्यांचे अंदाज खरे ठरतात की खोटे ठरतात हे पाहण्यासाठी आता फक्त काही तासांचा अवधी उरला आहे. परवा दुपारपर्यंत गुजरातचा  फैलला अपेक्षीत आहे.

COMMENTS