नवी दिल्ली – भाजपला आज धक्का बसणार असून पाटनाचे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना पाटना लोकसभा मतदार संघातून
काँग्रेस उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे.
गेली काही दिवसांपासून सिन्हा यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. वरिष्ठ नेत्यांवर नाराजीही व्यक्त केली होती. परिणामी, त्यांना पक्ष नेतृत्वानं पाटनातून उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान सिन्हा यांनी वेळोवेळी भाजपला लक्ष्य केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली होती. काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे म्हणून त्याची निवड केल्याची प्रतिक्रिया शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली आहे. यापूर्वी सपा, बसपा आणि आपनं देखील पक्ष प्रवेशासाठी आग्रह केला होता असंही सिन्हा यांनी म्हटलं आहे.
COMMENTS