…त्यानंतर दलितांना आरक्षण देऊ नये – भाजप खासदार

…त्यानंतर दलितांना आरक्षण देऊ नये – भाजप खासदार

नवी दिल्ली – दलित आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांना नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षणाचा लाभ दिला जाऊ नये तसेच दलितांच्या फक्त दोन पिढ्यांनाच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे. त्यानंतर त्यांना आरक्षण दिलं जाऊ नये असं मत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सी पी ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला बढतीप्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

दरम्यान आरक्षणाचा पूर्ण सिद्धांत हा अशा लोकांच्या मदतीसाठी आहे, जो सामाजिक रूपाने मागास आणि सक्षम नाही. त्यामुळे या पैलूंवरही विचार करणे आवश्यक असल्याचं मत न्यायालयानं मांडलं होतं. त्यावर सी पी ठाकूर यांनी हे वक्तव्य केलं आहे.अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सी पी ठाकूर हे मंत्री होते. यापूर्वीही ठाकूर यांनी दलित आरक्षणाला विरोध करत आरक्षणच संपुष्टात आणण्याची मागणी त्यांनी केली होती.

 

COMMENTS