मुंबई – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुंबई भाजपातर्फे मुंबईत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत ही यात्रा निघणार असल्याची माहिती आमदार विजय गिरकर यांनी दिली आहे. तर या यात्रेच्या समारोपाला होणा-या संविधान सन्मान सभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधीत करणार आहेत.
26 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता भाजपाच्या भव्य तिरंगा यात्रेची सुरूवात होणार असून चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या तिरंगा यात्रेला सुरूवात होणार आहे. शिवाजी पार्कपासून मांटुंगा, रूपारेल कॉलेजकडून ही यात्रा सेनापती बापट मार्गावरून दादर रेल्वे स्टेशन फुल मार्केटकडून पुढे एलफिस्टन रोड येथील हुतात्मा बाबू गेनू क्रिडांगण (कामगार मैदान) येथे या यात्रेचे सभेत रुपांतर होणार आहे.
COMMENTS