मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. सोलापूर जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी सहसंपर्कप्रमुख व जनसेवा संघटनेचे नेते धवलसिंह मोहिते-पाटील हे सध्या भाजपाच्या वाटेवर आहेत. याबाबत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत गोपनीय बैठक घेतली आहे. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची मंगळवेढा येथे भेट घेतली, जवळपास तासभर या नेत्यांमध्ये बंद खोलीत चर्चा धाली. त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे.
दरम्यान मोहिते यांनी भाजपात प्रवेश केला तर माढा मतदारसंघात राष्ट्रवादीला मोठा दणका बसणार असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर धवलसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा होती. परंतु आता त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिसत आहे.
COMMENTS