भाजपनं ‘या’ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले, ‘या’ नेत्यांना दिली उमेदवारी!

भाजपनं ‘या’ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले, ‘या’ नेत्यांना दिली उमेदवारी!

मुंबई – विधानसभा निवडणिकीसाठी भाजपनं आपल्या 124 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार भाजपनं काही विद्यमान आमदारांना डच्चू दिला आहे. पुण्यातील कंन्टोमेंटमधून दिलीप कांबळे यांचे तिकीट कापण्यात आले आहे. कांबळे यांच्याऐवजी त्यांचे बंधू सुनिल कांबळे यांना तिकीट देण्यात आले आहे. तर पुण्यातील शिवाजीनरमधून विजय काळे यांचे तिकीट कापले असून त्यांच्याऐवजी सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तसेच मुलुंडमधून सरदार तारासिंग यांचे तिकीट कापले असून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघातून आर टी देशमुख यांनाही धक्का बसला असून त्यांचे तिकीट कापून रमेश आडसकर यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे तिकीट कापण्यात आलेल्या या विद्यमान आमदारांना मोठा धक्का बसला आहे.

COMMENTS