मला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री व्हायचे नाही –नितीन गडकरी

मला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री व्हायचे नाही –नितीन गडकरी

मुंबई – मी आहे तिथेच समाधानी असून मला पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री व्हायचे नाही. मी दिल्लीत स्थिरावलो आहे त्यामुळे दिल्लीतच राहणार आहे असं स्पष्टीकरण केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. मी स्वत:ला पंतप्रधानपदाचा उमदेवार मानत नाही आणि तुम्हीही मानू नका. मला महाराष्ट्रातही परतायचे नाही असं गडकरी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात म्हटलं आहे.

दरम्यान केवळ राजकारणातच नाही तर विविध क्षेत्रात देशाचे नेतृत्व करण्याची ताकद मराठी माणसात आहे. परंतु याचा संबंध माझ्या पंतप्रधानपदाशी जोडू नका. मी आहे तिथे समाधानी आहे असंही गडकरींनी म्हटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपनं सत्ता स्थापन केली तरी नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात किंवा ते मुख्यमंत्री म्हणून राज्यात येऊ शकतात असं बोललं जात आहे. परंतु आपल्याला यो दोन्हींमध्ये रस नसून आपण आहे तिथेच समाधानी असल्याचं गडकरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

 

COMMENTS