नाराज असलेले भाजपचे आमदार आशिष देशमुखांना पक्षाकडून नोटीस!

नाराज असलेले भाजपचे आमदार आशिष देशमुखांना पक्षाकडून नोटीस!

नागपूर – नागपूर अधिवेशनात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाजपच्या आमदारांसाठी संघ मुख्यालयात बौद्धिकाचं आयोजन केलं होतं. बुधवारी आयोजित केलेल्या या बौद्धिकाला पक्षावर नाराज असलेले नेते एकनाथ खडसे आणि आशिष देशमुख यांनी दांडी मारली होती. याप्रकरणी आता आमदार आशिष देशमुख यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती आशिष देशमुख यांनी दिली आहे.

पक्षानं बजावलेल्या नोटीसीला योग्य वेळी उत्तर देणार असल्याचं आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे. देशमुख यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांना दोन पत्र लिहून सरकारच्या कामावर टीका केली आहे. तसेच बुधवारी विधीमंडळात परिसरात आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्यासोबत प्रवेश केला. मला काही तरी बोलायचे आहे असंही आशिष देशमुख अजित पवार यांना म्हटले असल्याचं अजित पवार यांनी स्वतः सांगितलं होतं. परंतु त्यांना काय बोलायचं आहे हे माहित नसल्याचंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान पक्षानं पाठवलेल्या नोटिसीला आशिष देशमुख आता काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आशिष देशमुख हे पक्ष सोडण्याच्या तयारीत तर नाहीत ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

COMMENTS