तिघे एकत्र येऊनदेखील भाजपा एक नंबर

तिघे एकत्र येऊनदेखील भाजपा एक नंबर

मुंबई – “ज्याप्रकारे भाजपाला लोकांनी सर्मथन दिलं आहे त्याचा मला अतिशय आनंद आहे. आम्ही समर्थन दिलेले सगळे पॅनल ग्रामपंचयातीमध्ये चांगला विजय मिळवत आहेत. विशेष म्हणजे विदर्भ, मराठवाडा. उत्तर महाराष्ट्र, कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल… सगळ्या भागात भाजपा एक नंबरचा पक्ष झाला आहे. इतर पक्षांच्या तुलनेत आम्ही खूप पुढे गेलो आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये आम्ही सर्व जागा जिंकल्या आहोत. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे,” असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

फडणवीस म्हणाले, “विदर्भात अभुतपूर्व यश आहेच, पण कोकणातदेखील चांगलं यश मिळालं आहे. खासकरुन सिंधुदूर्गात इतक्या चांगल्या प्रकारे म्हणजेच जवळपास ८० टक्के ग्रामपंचायती जिंकलो आहोत. राणे कुटुंब, रवींद्र चव्हाण तसंच तेथील कार्यकर्ते सर्वांनीच खूप मेहनत केली. सत्तेत असतानाही रत्नागिरीत यश मिळालं नव्हतं. पण आता मोठं यश मिळालं आहे. ठाणे, रायगडमध्येही यश मिळालं आहे. स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते लढवय्ये आहेत. एकूण जे वातावरण तयार होतंय, आम्ही सातत्याने लोकांना हे सरकार कशा पद्धतीने अन्याय करतंय हे समजावून सांगतोय त्याचा एक चांगला परिणाम झाला. तिघे एकत्रित येऊनही भाजपा पहिल्या क्रमांकाच पक्ष झाला आहे,” असं फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात झालेल्या पराभवावर बोलताना ते म्हणाले की, “असं होत असतं, आती मी जयंत पाटील सासूरवाडीत जिंकू शकले नाही अशी बातमी पाहिली, तिथे राष्ट्रवादी हारली. एखाद्या गावात कमी अधिक होत असतं. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्रात चंद्रकांतदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. पण लोकांनी कौल भाजपाच्या बाजूने दिला. सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीत चांगलं यश मिळालं आहे. एखाद्या गावात काय झालं हे महत्वाचं नाही पण एकूण कौल भाजपाला मिळाला आहे”.

COMMENTS