“भाजपाने काँग्रेस आमदाराला 100 कोटींची ऑफर दिली !”

“भाजपाने काँग्रेस आमदाराला 100 कोटींची ऑफर दिली !”

नवी दिल्ली –  भाजपाने काँग्रेस आमदाराला 100 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपा प्रयत्न करत असून त्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना ऑफर दिली जात असल्याचं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.

भाजपा आमदार नारायण त्रिपाठी यांनी काँग्रेस आमदार बजीनाथ कुशवाहा यांच्याशी संपर्क साधत त्यांना आपल्यासोबत एका ढाब्यावर नेलं. तिथे भाजपाचे माजी मंत्री नरोत्तम मिश्रा आणि विश्वास नारंग यांनी कुशवाहा यांची भेट घेतली. सरकारमधून बाहेर पडण्यासाठी कुशवाहा यांना 100 कोटींची ऑफर देण्यात आली. त्यांना भाजपा सरकारमध्ये मंत्रीपदाचीदेखील ऑफर देण्यात आली असल्याचा दावा दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

भाजपाने दिग्विजय सिंह यांचा आरोप फेटाळून लावला आहे. दिग्विजय सिंह यांनी केलेले आरोप चुकीचे असून ते सिद्ध करुन दाखवावेत असं आव्हान भाजपाने दिलं आहे.तसेच गेल्या अनेक काळापासून प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते असे आरोप करत असल्याचं भाजपानं म्हटलं आहे.

COMMENTS