काँग्रेस आमदाराला 100 कोटीला विकत घेण्याचा भाजपकडून प्रयत्न, काँग्रेसनं प्रसिद्ध केली ऑडिओ क्लीप !

काँग्रेस आमदाराला 100 कोटीला विकत घेण्याचा भाजपकडून प्रयत्न, काँग्रेसनं प्रसिद्ध केली ऑडिओ क्लीप !

 कर्नाटक – कर्नाटकमध्ये बहूमत मिळवण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. यासाठी काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडण्याचा जोरदार प्रयत्न काँग्रेसकडून केला जात असून काँग्रेस आमदार बसवनगौडा यांना भाजपकडून 100 कोटींची ऑफर देण्यात आली आहे. याबाबतची ऑडिओ क्लीप काँग्रेसनं प्रसिद्ध केली असून भाजपाचे माजी मंत्री आणि खाणमाफीया जनार्दन रेड्डी यांनी फोन करुन बसवनगौडा यांना 100 कोटींची आणि मंत्रिपदाची ऑफर दिली आहे.

 बसवनगौडा आणि जनार्दन रेड्डी यांच्यातील संभाषण

 जनार्दन रेड्डी –  मी बसवनगौडांसोबत बोलत आहेत का? तुम्ही फ्री आहात ?

बसवनगौडा – होय, मी बसवनगोडा बोलत आहे.

जनार्दन रेड्डी – आधी ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या सर्व विसरून जा. माझे चांगले दिवस सुरु झाले असून मी राष्ट्रीय अध्यक्षांसोबत एक बैठक घेणार आहे. या बैठकीमध्ये तुम्ही त्यांच्याशी समोरासमोर बोलू शकता आणि त्यानंतर पुढचं पाऊल टाकू.

बसवनगौडा – नाही सर, जेव्हा मी माझी बिकट परिस्थिती होती, तेव्हा त्यांनी मला आमदार केलं आहे.

जनार्दन रेड्डी – मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बीएसआरची स्थापना केली तेव्हा आपले खूप वाईट दिवस होते. त्यावेळी खूप विरोध वाढला होता. त्यामुळे आपण भरपूर गमावले आहे. परंतु आता आपले चांगले दिवस आले असून तुम्ही 100 पटीने पुढे जाणार आहात. शिवानगवडा नायक हे माझ्यामुळे मंत्री झाले आहेत. आज ते मोठे झालेत. तसेच राजू गौडांनाही माझ्यामुळे मोठा फायदा झाला आहे.

बसवनगौडा – होय…

जनार्दन रेड्डी – हे आपले दुर्दैव होते आणि ती आपली वाईट वेळ होती. आज शिवनगौडा जिंकतील हे आपल्यासाठी फायद्याचं नाही. तुम्ही मंत्री बनू शकता. तुम्हाला समजतय का?  थेट आपण मोठ्या माणसाला भेटणार आहोत. मी तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची संधी देईन .. (ऑडिओ ब्रेक). तसेच तुम्ही आतापर्यंत जमवलेली संपत्ती 100 पटीनं वाढणार आहे.

बसवनगौडा – मला माफ करा सर… माझी बिकट परिस्थिती असताना त्यांनी मला तिकीट दिले. आणि मला जिंकून आणले. अशा परिस्थितीत मी त्यांचा विश्वासघात करू शकत नाही. मला तुमच्याबद्दल आदर आहे.

COMMENTS