“शिवसेनेच्या आमदाराला भाजपकडून 50 कोटींची ऑफर !”

“शिवसेनेच्या आमदाराला भाजपकडून 50 कोटींची ऑफर !”

मुंबई – सत्तास्थापनेवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून शिवसेनेच्या आमदाराला भाजपने 50 कोटींची ऑफर दिली असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काँग्रेसच्या आमदारांशीही भाजपने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली आहे.पक्षांतर करणाऱ्या 80 टक्के माजी आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला. हा धडा सगळ्यांनी घेतला आहे. त्यामुळे पक्ष सोडण्याची आता कोणाची हिंमत होणार नसल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सत्तास्थापनेसाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. शिवसेनेच्या एका आमदाराला 50 कोटी रुपयांची खुली ऑफर दिल्याचं मी टीव्ही चॅनलवर पाहिलं असून आमच्या आमदारांनाही संपर्क करण्यात आला, असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. मित्रपक्षाच्या आमदारावरच त्यांचा डोळा आहे. याचा अर्थ ते काहीही करु शकतात. त्यांनी आमच्या आमदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट 100 टक्के खरी असल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS