“भाजपकडून काँग्रेसच्या अनेक आमदारांना पक्ष सोडण्यासाठी २५ कोटींची ऑफर !”

“भाजपकडून काँग्रेसच्या अनेक आमदारांना पक्ष सोडण्यासाठी २५ कोटींची ऑफर !”

नवी दिल्ली – भाजपकडून काँग्रेसच्या अनेक आमदारांना पक्ष सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे.सुरुवातीला १० कोटी आणि सरकार पडल्यानंतर १५ कोटी रुपये दिले जातील, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. केंद्रीय नेतृत्त्वाकडून सतिश पुनिया आणि राजेंद्र राठोड यांच्यावर विशेष जबाबादारी सोपविण्यात आली असल्याचं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे. ते आज पत्रकारपरिषदेत बोलत होते.

दरम्यान सध्या आपल्याला कोरोनाच्या लढाईवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मात्र, भाजप सध्या राजस्थानमधील सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपचे सतिश पुनिया आणि राजेंद्र राठोड हे केंद्रीय नेतृत्त्वाच्या सांगण्यावरून वेगवेगळे डाव टाकत आहेत. त्यांच्याकडून अनेक आमदारांना पैशाचे आमिष दाखवण्यात आले आहे. भाजप देशाला काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करत होता. मात्र, आता भाजपलाच काँग्रेसची भीती वाटू लागली आहे. राजस्थानमधील सरकार स्थिर असून ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. सध्या आम्ही पुढील निवडणूक जिंकण्याची तयारी करत आहोत, असही गेहलोत यांनी म्हटले आहे.

COMMENTS