बदनाम छिंदममुळे अहमदनगर महापालिकेच्या उपमहापौरपदापासून भाजपची माघार !

बदनाम छिंदममुळे अहमदनगर महापालिकेच्या उपमहापौरपदापासून भाजपची माघार !

अहमदनगर – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणा-या श्रीपाद छिंदमची भाजप आणि उपमहापौरपदावरुन हकालपट्टी केली होती. रिक्त झालेल्या या उपमहापौरपदासाठी येत्या ५ मार्चला निवडणूक घेण्यात येणार आहे. यासाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. हे पद भाजपला सोडले असल्याने त्यांचा उमेदवार अपेक्षित होता. परंतु छिंदमच्या निषेधार्थ त्यानेच उपभोगलेले मनपातील उपमहापौरपद आता घ्यायचे नसल्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे व शहर जिल्हाध्यक्ष खा. दिलीप गांधी यांनी बैठक घेऊन उपमहापौरपदासाठी भाजपचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसल्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे गांधी यांनी एकाच दगडात दोन पक्ष मारले असल्याचं बोललं जात आहे. छिंदममुळे होत असलेली पक्षाची बदनामी पाहता प्रायश्चित म्हणून उपमहापौरपदाचा त्याग केला आहे. तर पक्षांतर्गत गटबाजीच्या राजकारणात नगर शहर भाजपातील माजी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्या गटाकडे जाणारे उपमहापौरपदही रोखले आहे. गांधी यांच्या या निर्णयामुळे शहरात जोरदार चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS