भाजपचा यू टर्न, “अमित शाह तसं बोललेच नाहीत !”

भाजपचा यू टर्न, “अमित शाह तसं बोललेच नाहीत !”

नवी दिल्ली – भाजपने आपल्या भूमिकेवर यूटर्न घेतला असल्याचं दिसत आहे. कारण २०१९ च्या निवडणुकांपूर्वी अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या कामाला सुरुवात होणार असल्याचं वक्तव्य भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलं होतं. परंतु याबाबत आता भाजपाने यू टर्न घेतला आहे. असं कोणतही वक्तव्य अमित शाह यांनी केलं नसल्याचं भाजपानं म्हटलं आहे. राम मंदिर आणि बाबरी प्रकरण न्याय प्रविष्ट असताना अमित शाह यांनी हे वक्तव्य कसे केले याची चर्चा देशभरात सुरु झाली. परंतु अशातच भाजपाने यू टर्न घेतला अशल्याचं दिसत आहे.

दरम्यान भाजपातील नेत्यांसोबत अमित शाह यांची एक बैठक शुक्रवारी हैदराबादमध्ये झाली होती. त्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगण्यात आले होते. निवडणुका जाहीर होण्याआधीच राम मंदिर निर्मितीच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जातील असे त्यांनी स्पष्ट केलं असल्याची माहिती होती. तसेच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पी शेखरन अमित शाह यांनी केलेले हे वक्तव्य सांगितले. त्यामुळे भाजपमध्ये नेमकं चाललं तरी काय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

COMMENTS