मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीला भेट का दिली नाही?, भाजपचा सवाल!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीला भेट का दिली नाही?, भाजपचा सवाल!

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीला भेट का दिली नाही, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरु आहे. या तयारीच्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी उपस्थित राहायला हवं होतं. संबंधित मंत्र्यांना सांगून देखील ते चैत्यभूमीवर उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांची अद्यापही मानसिकता बदललेली नाही. ती अजुनही जुन्या काळातीलच असल्याचं भाजप नेते भाई गिरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चैत्यभूमीला भेट दिली. मात्र, उद्धव ठाकरे अद्यापही चैत्यभूमीवर का गेले नाहीत असही भाई गिरकर यांनी म्हटलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या बुद्धीमत्तेसाठी आणि संविधान निर्मिती करुन दिलेल्या कामासाठी देशातच नाही, तर जगातही सन्मान होतो. त्यामुळे येथे देखील त्यांचा योग्य सन्मान होणं आवश्यक असल्याचं गिरकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS