राज्यात सत्तापालट करण्यासाठी भाजपची तयारी,  ‘असा’ आहे मास्टर प्लॅन?

राज्यात सत्तापालट करण्यासाठी भाजपची तयारी, ‘असा’ आहे मास्टर प्लॅन?

नवी दिल्ली – राज्यातील महाविकास आघाडीच्या हातातून सत्ता खेचून घेण्यासाठी भाजपनं कंबर कसली असल्याचं दिसत आहे. कारण सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपनं मास्टर प्लॅन आखला असल्याची माहिती आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात सत्तापालट करण्याकरिता भाजप पूर्ण ताकदीनिशी तयार होत आहे. याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे.सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला सत्तापलट करण्यात रस नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीत जवळपास पन्नास मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर अमित शहा यांनी फडणवीस यांना जेवणासाठी आमंत्रण दिले आहे. त्यामुळे या डिनर डिप्लोमसी मागे राज्यातील महाविकास आघाडीला सुरूंग लावण्याची नियोजन भाजपकडून केलं जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

फडणवीस यांनी दिल्लीतील दोन दिवसीय दौऱ्यामध्ये विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. यावेळी काही गुप्त बैठकी देखील झाल्याची माहिती आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील डाव हा उलटा पडू नये, यासाठी सर्व ती काळजी भाजपच्या नेत्याकडून घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या आगामी हालचालीकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS