बीड – लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बीडमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे. आज घेण्यात आलेल्या संघर्ष मेळाव्यात मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार बंजरंग सोनवणे यांना जाहीर पांठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान आपण शेतकय्राच्या मुलाला पाठिंबा देत असल्याचं मेटे यांनी म्हटलं आहे. बीडमध्ये सामान्यांसाठी लढाई लढतोय, शेतकय्रांसाठी लढाई लढत आहे. त्यामुळे शेतकय्राच्या पुत्राला पाठिंबा देणार असल्याची घोषणा मेटे यांनी केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसंग्राम बीड जिल्ह्यात भाजपचे काम करणार नाही, पण राज्यात इतर ठिकाणी भाजपसोबत असेन, अशी भूमिका विनायक मेटेंनी जाहीर केली होती. परंतु अशी भूमिका चालणार नाही, असा दम भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भरला. मात्र तरीही विनायक मेटे मागे हटले नसुन बीडमध्येे राष्ट्रवादीचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS