मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी “या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं ट्वीट केलं आहे.
न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय !
या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा ! #CBI #SupremeCourt— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 19, 2020
आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी विचारला आहे.
कुणी,मुंबई पोलिसांना बोलू दिले नाही?
पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले असतात,पण सुशांतच्या केसमध्ये अन्य कोणी पोलिसांचे हात बांधले होते का?
सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे दिला.याप्रकरणी
आमच्या मुंबई पोलिसांना जी लपवाछपवी करावी लागली त्याची जबाबदारी राज्य सरकार घेणार का?(2/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 19, 2020
"पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही!" "सिंघम" चा हा डायलॉग शंभर टक्के खरा आहे.
पण सुशांत सिंग रजपूतच्या केसमध्ये मुंबई पोलिसांनी का ठरवले नाही?
कुणी त्यांना ठरवू दिले नाही?
कुणी त्यांना त्यांच्या नाव-लौकिक,ख्यातीप्रमाणे काम करु दिले नाही?
(1/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 19, 2020
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा. मुंबई पोलिस आयुक्तांनी दोन महिने एफआयआर न घेणे दुर्दैवी आहे. सुशांतसिंह च्या परिवाराला न्याय मिळेल आणि ठाकरे सरकारची दादागिरी संपेल” असे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
सुशांत केस में #सुप्रीमकोर्ट के फैसले के बाद उद्धव सरकार घिर गई है। सुशांत की मौत की जांच #सीबीआई को देने के फैसले के बाद बीजेपी ने महाराष्ट्र के गृहमंत्री #अनिल_देशमुख का इस्तीफा मांगा है
एनसीपी प्रमुख #शरद_पवार के परिवार ने भी महाराष्ट्र की उद्धव सरकार पर वार किया है। https://t.co/7UzodWZagt
— APN न्यूज़ हिंदी (@apnlivehindi) August 19, 2020
सर्वसामान्य जनतेच्या मनात सुशांतसिंह प्रकरणासंदर्भात शंका कुशंका होत्या आणि त्यामुळेच सीबीआय चौकशीची अपेक्षा होती ती सन्माननीय कोर्टाने मान्यता दिली. त्यामुळे दूध का दूध पानी का पानी हे या प्रकरणात होईल असं मत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे.
COMMENTS