नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक मोठा धक्ता बसला आहे. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी राजीनामा दिला आहे. भाजप सत्तेसाठी वाट्टेल ते करत असून दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या तत्त्वाचा भाजपला विसर पडला असल्याची टीका त्यांनी पक्षश्रेष्ठींवर केली आहे. याबाबत त्यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान गेगांग अपांग यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठा धक्ता बसला आहे. अपांग हे सात वेळा आमदार आणि 23 वर्ष अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेच्या केवळ दोन जागा असल्या तरी एकूण ईशान्य भारताचा विचार करता हा मोठा धक्का मानला जात आहे.
I Have resigned from the primary membership of @BJP4India . Will now focus on grassroot problems. pic.twitter.com/bYrrYykCkh
— Gegong Apang (@gegongapang) January 15, 2019
या पत्रात त्यांनी जोरदा टीका केली आहे. पक्ष फक्त सत्ता मिळवण्याचं व्यासपीठ बनलं असून हा पक्ष एका अशा नेत्याच्या हातात आहे, जो विकेंद्रीकरण आणि लोकशाही पद्धतीने निर्णय प्रक्रियेचा विरोध करत होता. या मूल्यांना त्याने कधीही मानलं नाही. वाजपेयींनी नेहमी एकतेवर विश्वास ठेवला आणि राजधर्म शिकवला. ते एक महान नेते होते. आज त्यांनी शिकवलेल्या राजधर्माचंच पालन करतोय, असंही अपांग यांनी म्हटलं आहे.
COMMENTS