नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार धक्का बसला आहे. माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे निलंबीत खासदार किर्ती आझाद काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. १८ फेब्रुवारी रोजी किर्ती आझाद काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काल पुलवामा येथे झालेल्या हल्यामुळे किर्ती आझाद यांना काँग्रेस प्रवेश लांबणीवर पडला आहे. काँग्रेसप्रवेशाबाबतची माहिती किर्ती आझाद यांनी ट्विट करत दिली आहे.
श्री @RahulGandhiजी से भेंट हुई पुलवामा में हुए आतंकी हमले में शहीद हुए हमारे सैनिकों के सम्मान में मेरा @INCIndia में जॉइनिंग अब 18 को होगा 3 दिनों का शोक मनाया जाएगा कोई व्यक्ति या पार्टी देश से बढ़कर नहीं हो सकती और सैनिकों की शहादत पूजनीय है उनके सम्मान में यह निर्णय लिया गया
— Kirti Azad (@KirtiAzadMP) February 15, 2019
दरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांच्यावर किर्ती आझाद यांनी डीडीसीएमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजपाने किर्ती आझाद यांना पक्षातून निलंबित केले होते. किर्ती आझाद बिहारच्या दरभंगा मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले आहेत. दरभंगा मतदार संघातून त्यांनी सलग तीनदा विजय मिळवला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS