पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधात भाजपची नवी खेळी !

पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधात भाजपची नवी खेळी !

मुंबईपालघर लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये आता नारायण राणे विरुद्ध शिवसेना असाच सामना पहायला मिळणार आहे. कारण नारायण राणे हे स्वतः भाजपचा प्रचार करणार आहेत. यासाठी राणे यांना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारासाठी विनंती केली आहे. त्यामुळे राणे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत ते प्रचाराला जाणार आहेत.

दरम्यान चिंतामणराव वनगा यांच्या निधनानंतर पालघर लोकसभेची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत वनगा कुटुंबियांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने चिमामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून दामोदर शिंगडा यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत पहायला मिळत आहे.

दरम्यान राणे आणि शिवसेना यांचं वैर सर्वश्रृत असून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते असलेल्या नारायण राणे यांना भाजपने राज्यसभेची खासदारकी दिली आहे. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजप राणेंना शिवसेने विरुद्ध भिडवणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं राणेंना प्रचाराच्या मैदानात उतरवून भाजपनं नवी खेळी खेळली असल्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS