मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अत्यंत विक्रुत प्रकारचे लिखाण करणारं जेम्स लेन प्रकरण भाजपच्या माजी आमदाराला किरकोळ वाटतंय. राष्ट्रवादीत होत असलेला अपमान सहन न करता उदयनराजे यांनी भाजपात प्रवेश करावा असं आवाहन भाजपचे माजी आमदार दिलीप येळगावकर यांनी केलं आहे. हे करत असताना त्यांनी उदयनराजे यांनी भाजप का सोडला होता याचं कारण दिलं. उदयनराजे यांची राजकीय कारकिर्द भाजपात बहरली होती. मात्र जेम्स लेन सारख्या किरकोळ मुद्यावरुन त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता असंही येळगावकर म्हणाले.
शिवाजी महाराजांची बदनामी करणारं प्रकरण किरकोळ कसं असू शकतं ? असा प्रश्न आता शिवभक्त विचारु लागले आहे. यावरुन येळगावकर यांच्याविरोधात सोशल मीडियातून संताप व्यक्त केला जा आहे. हे प्रकरण किरकोळ कसं काय ? असा पत्रकारांनी प्रतिप्रश्न विचारल्यावर येळगावकर यांनी सारवासारव करण्याचा प्रय़त्न केला… पहा काय म्हणाले दिलीप येळगावकर….
दरम्यान माजी आमदार दिलीप येळगावकर यांच्या जेम्स लेन प्रकरणावरच्या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. माजी आमदार दिलीप येळगावकरांनी नाक घासून माफी मागावी असं संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे. येळगावकरांनी शिवरायांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागावी अशी मागणी पत्रकार परिषदेत श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे.
COMMENTS