भाजपचा प्लॅन बी तयार, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह केंद्रातही दोन मंत्रिपदे देणार?

भाजपचा प्लॅन बी तयार, राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह केंद्रातही दोन मंत्रिपदे देणार?

मुंबई – गेली काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्रित येऊन सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. परंतु अशातच आता सत्तेसाठी भाजपचा प्लॅन बी तयार असल्याचं बोललं जात आहे. सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी झाल्यास त्यांना उपमुख्यमंत्रिपद व 15 मंत्रिपदे दिली जाऊ शकतात, शिवाय केंद्रात एक किंवा दोन मंत्रिपदे दिली जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

असा आहे भाजपचा प्लॅन बी?

भाजपला पाठिंबा देण्याऐवजी राष्ट्रवादीतील एक गट बाहेर पडून भाजपसोबत जाईल, अशीही चर्चा आहे. भाजपचे 105 तर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत. तसेच 14 अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा पाहता एकूण संख्याबळ 173 होते. राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाली नाही, तरी भाजपला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहून मदत करू शकते. राष्ट्रवादीचे 54 सदस्य अनुपस्थित राहिल्यास सभागृहात 234 सदस्य उरतात. अशा वेळी बहुमतासाठी भाजपला 117 आमदारांची गरज असेल आणि भाजपकडे 119 आमदार आहेत. त्यामुळे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकेल.

COMMENTS