मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरात जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली आहे. या भेटीदरम्यान ते मोहन भागवत यांच्यासोबत विविध मुद्यांवर चर्चा करतील, असं म्हटलं जात आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल 23 मे रोजी लागणार आहेत त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
NDAला पूर्ण बहुमत न मिळाल्यास अशा परिस्थितीत आरएसएसकडून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींऐवजी अन्य नेत्याच्या नावाचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. याच कारणामुळे दोघांचीही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
दरम्यान, भाजप पूर्ण बहुमतासहीत निवडणूक जिंकेल आणि केंद्रामध्ये एनडीएचं सरकार स्थापन होईल असा दावा भाजप नेते करत आहेत. परंतु बहुमत न मिळाल्यास अशा स्थितीत आरएसएस मोदींऐवजी अन्य दुसऱ्या नेत्याला पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदींच्या गळ्यात पुन्हा पंतप्रधानपदाची माळ पडणार की भाजपला बहुमताचा जादुई आकडा गाठता न आल्यास भाजपच्या दुसऱ्या कोणत्या नेता पंतप्रधान होणार हे 23 मे रोजी समजणार आहे.
COMMENTS