पुणे – औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर दैनिक सामनातून टिका करण्यात आली होती. यावर आज पुण्यात माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहणार असल्याचे सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, संभाजी महाराजांचं नाव हे संभाजीनगर शहराला असणं याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती. पाच सहा महिन्यांपूर्वी मी संभाजीनगर नामांतर व्हावं असं म्हटलं होतं तेव्हा सामनाने अग्रलेख लिहिला होता,” त्याच्यामध्ये “ज्यावेळी हे गोधड्या भिजवत होते तेव्हा बाळासाहेबांनी मागणी केली होती असं ते म्हणाले होते. चांगलं आहे, मग बाळासाहेबांनी केलेली मागणी धरुन धरा. हा काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद असून आम्हाला यात पडायचं नाही,” असा टोमणा चंद्रकांत पाटील यांनी मारला.
पुढे ते म्हणाले की, “सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात..अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली तिथे रश्मी वहिनी असणारं संपादकीय असू शकत नाही”.
“औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते पहिले हटवा.
COMMENTS