मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता भाजपही आपल्या सभांमधून ए लाव रे तो व्हिडीओ म्हणणार आहे. राज ठाकरे मांडत असलेल्या मुद्द्यांची वस्तुस्थिती मांडण्यासाठी भाजपही आपल्या सभेत व्हिडीओ दाखवणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. राज ठाकरे ज्या स्टाईलनं आरोप करत आहेत, त्याच स्टाईलनं भाजप 27 तारखेच्या सभेत उत्तर देणार असल्याचं तावडे यांनी म्हटलं आहे.
तसेच आमची राज ठाकरेंना विनंती आहे की, 27 एप्रिलनंतरही त्यांनी त्यांच्या सभा सुरु ठेवाव्यात. कारण या टुरिंग टॉकीजमुळे जनतेची चांगली करमणूक होत आहे. तसेही राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नाही. त्यामुळे राज ठाकरेंना त्यांची स्टँडअप कॉमेडी सुरु ठेवायला काही हरकत नसल्याचा टोलाही विनोद तावडेंनी लगावला आहे.
COMMENTS