शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावरच राहुल गांधी बोलतात – अमित शाह

शरद पवारांनी इंजेक्शन दिल्यावरच राहुल गांधी बोलतात – अमित शाह

मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंजेक्शन दिल्यावरच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी बोलतात असं वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी केलं आहे. तसेच राहुल गांधी आमच्याकडे तीन वर्षांचा हिशेब मागतात. मात्र त्यांच्या चार पिढ्यांनी काय केलं, हे आधी सांगावं, अशी जोरदार टीका भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. तसेच भाजप आरक्षण बंद होऊ देणार नाही, असं स्पष्टीकरणही शाह यांनी यावेळी दिलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

दरम्या राहुल बाबा आजकाल शरद पवारांसोबत बसतात. पवारांनी त्यांना इंजेक्शन दिलंय म्हणून हल्ली खूप उड्या मारत आहेत. राहुल बाबा विचारतात मोदीजी आपने साडे चार साल में क्या किया, पण देश विचारतोय राहुल बाबा चार पीढ्यांपासून तुम्ही काय केले?”, असं टीकास्त्र अमित शाहांनी केलं आहे.

COMMENTS