रावेरमधील खासदार बदलला पाहिजे का ? 35 टक्के नागरिकांचा होकार !

रावेरमधील खासदार बदलला पाहिजे का ? 35 टक्के नागरिकांचा होकार !

मुंबई – माझी कामगिरी समाधानकारक असल्याचा दावा भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. दिल्लीतील चाणक्य संस्थेच्या माध्यमातून भाजपने एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये भाजपचे महाराष्ट्रातील सहा खासदार आणि 50 आमदारांची कामगिरी निराशाजनक असल्याचे समोर आले होते.त्यामुळे या आमदार आणि खासदारांना आगामी निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी दिली जाणार नसल्याचं बोललं जात आहे. यामध्ये रक्षा खडसे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. परंतु आपल्या मतदारसंघात माझी कामगिरी समाधानकारक असल्याचा दावा रक्षा खडसे यांनी केला आहे.

रक्षा खडसे यांच्या रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व्हेमध्ये 38 टक्के नागरिकांनी त्यांच्या कामगिरीवर संतुष्ट असल्याचं मत नोंदवलं आहे. तर रावेरमधील खासदार बदलला पाहिजे का असे विचारलं असता 35 टक्के नागरिकांनी होय असं उत्तर दिलं आहे. त्यामुळे याठिकाणी भाजप आपला उमेदवार बदलणार का यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

COMMENTS