मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिली.सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेट कांजूरमार्ग येथे हलवण्यात आलं आहे. शासकीय जमीनीवर हे कारशेड होणार कारशेड होणार असून त्यासाठी शून्य खर्च येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State https://t.co/E8qhmRTulz
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 11, 2020
या स्थगितीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेते राम कदम आणि किरीट सोमय्या यांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मेट्रो कारशेड रद्द केल्यामुळे पाच हजार कोटींचा खर्च वाढणार असल्याचं म्हटलं आहे. पाहा काय म्हणालेत किरीट सोमय्या.
दरम्यान मंदिरं आणि रेल्वे सेवा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजून परवानगी दिली नाही. त्यामुळे मंदिरांवर मुख्यमंत्र्यांचा एवढा राग का आहे असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.
तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या जागेसाठी कोणताही खर्च वाढणार नसल्याचं म्हटलं आहे. तसेच शिवसेना, भाजप युतीचं सरकार असतानाही शिवसेनेनं आरे कारशेडला विरोध केला होता असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मागील वर्षी आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणप्रेमींची बाजू उचलून धरल्यानं हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला होता. सत्तेत येताच ठाकरे सरकारनं आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थिगिती दिली होती. त्यानंतर, आज ठाकरे सरकारनं आरेतील कारशेड रद्द करत कांजूरमार्ग येथे होणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेला संबोधित करताना आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याची घोषणा केली आहे. यासाठी राज्य शासनाने सरकारी जमीन मोफत दिली आहे. या निर्णयामुळे आरे कारशेड विरोधातील आंदोलनकर्त्यांचा विजय झाला असल्याचं ते म्हणाल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांनी आज महाराष्ट्र राज्यातील जनतेला संबोधित करताना आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याची घोषणा केली आहे. यासाठी राज्य शासनाने सरकारी जमीन मोफत दिली आहे. या निर्णयामुळे आरे कारशेड विरोधातील आंदोलनकर्त्यांचा विजय झाला आहे. pic.twitter.com/cC6kw70W79
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 11, 2020
आरे कारशेडला माझा विरोध होता. तशी भूमिकादेखील मांडली होती. त्यामुळं आरेतील जंगलासाठी आंदोलन करणाऱ्या पर्यावरणवाद्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरेतील ६०० एकर जमीन जंगल म्हणून घोषित केली आहे. त्याचबरोबर या जंगलाची व्याप्ती ८०० एकर झाली आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मेट्रो ६ आणि मेट्रो ३ साठी कार डेपो कांजूरमार्ग येथे कॉमन असणार आहे. यासाठीची जमीन गेल्या आठवड्यात शून्य रुपये किमतीने @MMRDAOfficial च्या ताब्यात देण्यात आली आहे. मातीचे परीक्षण सुरू झाले आहे.
नेहमी सांगितले जात होते की यासाठी ₹ १०,००० कोटींचा खर्च होईल पण हे विनामूल्य होत आहे.— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 11, 2020
आरे येथील ८०८ एकर जमीन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे. ९ महिन्यानंतर, सदर जमीन वनक्षेत्र म्हणून घोषित केली जाईल. जगातील इतर कोणत्याही शहरामध्ये ८०८ एकर जमीन वन म्हणून घोषित केली असेल असे मला वाटत नाही असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
आरे येथील ८०८ एकर जमीन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे. ९ महिन्यानंतर, सदर जमीन वनक्षेत्र म्हणून घोषित केली जाईल. जगातील इतर कोणत्याही शहरामध्ये ८०८ एकर जमीन वन म्हणून घोषित केली असेल असे मला वाटत नाही. pic.twitter.com/jSzXxEc7Cp
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 11, 2020
आरे येथे जंगल म्हणून घोषित केलेल्या क्षेत्रातील आदिवासी, तबेले असतील, त्यांचे सर्वांचे हित जपले जाईल.तसेच आरेतील वृक्षतोडीविरोधात खंबीरपणे उभे राहिलेल्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे असही आदित्य ठाकरे म्हणालेत.
आरे येथे जंगल म्हणून घोषित केलेल्या क्षेत्रातील आदिवासी, तबेले असतील, त्यांचे सर्वांचे हित जपले जाईल.
तसेच आरेतील वृक्षतोडीविरोधात खंबीरपणे उभे राहिलेल्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 11, 2020
या निर्णयाबद्दल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks जी, मंत्री @bb_thorat जी, @AnilDeshmukhNCP जी, @mieknathshinde जी, @SanjayDRathods जी, @SunilKedar1111 जी, महाविकास आघाडी सरकार आणि @mybmc महापौर @KishoriPednekar ताई यांचा आभारी आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 11, 2020
तसेच @MMRDAOfficial, @MumMetro, @MahaForest, @maharevenue, आरे, नगरविकास आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो.
हा सर्व मुंबईकरांचा विजय आहे!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 11, 2020
उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानंतर मनसेनं देखील त्यांचे आभार मानले आहेत. अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री काकांचे आभार मानले आहेत.’ हा लोकांच्या संघर्षाचा विजय आहे. मी समजू शकतो आज आरे कारशेडसाठी आंदोलन करणारी लोकं किती आनंदी असतील असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
'आरे' संवर्धनाच्या लढ्यातील आंदोलकांचे तसंच 'आरे' वनजमिनीला जंगल घोषित केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अमित ठाकरे ह्यांनी मुख्यमंत्र्यांचे, महाराष्ट्र सरकारचे मानले आभार. #अमितठाकरे #पर्यावरणप्रेमी #महाराष्ट्रसैनिक #AareyForest @CMOMaharashtra pic.twitter.com/3FZj0JEmdc
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 11, 2020
COMMENTS