अहमदनगर – राज्यातील सुप्रसिध्द किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे आता राजकीय मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपकडून इंदुरीकर महाराजांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंदुरीकर महाराजांना संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात
उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु याबाबत भाजपा प्रवेश केल्याची किंवा आपली कुठलीही राजकीय भूमिका इंदुरीकर यांनी जाहीर केली नाही.
दरम्यान संगमनेरमध्ये मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज पार पडली. यावेळी भाजपच्या मंचावर इंदुरीकर महाराजांनी हजेरी लावल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. यावेळी आपल्या भाषणापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन महाराजांचे स्वागत केले. तसेच, महाराजांसोबत चर्चाही केली. यावेळी इंदुरीकर महाराज यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांची मदत केली आहे. ते ही मदत देण्यासाठी भाजपच्या मंचावर आले होते अशी माहिती आहे. परंतु राज्यात सध्या भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरु आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजही भाजपमध्ये येतील अशी चर्चा सुरु झाली आहे.
COMMENTS