सातारा – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजपमध्ये युती झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दोन्ही पक्षांकडून आपल्या गोटातील नेत्यांसाठी काही मतदारसंघावर दावा केला जात आहे. सातारा लोकसभा मतदासंघावर भाजप दावा करणार असल्याची माहिती आहे. 2014 ला शिवसेनेकडून RPI आठवले गटाला हा मतदारसंघ सोडला होता, परंतु आता RPI भाजपच्या गोटात आहे. त्यामुळे या मतदारसंघावर आता भाजप दावा करणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातुन भाजपकडून माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे नाव चर्चेत असून
माथाडी कामगार नेते असलेल्या नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सध्या नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर अध्यक्ष आहेत.
COMMENTS