मुंबई – भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यानं आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाला उधाण आलं आहे. ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुरली मनोहर जोशी सुमारे एक तास मातोश्रीवर होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेल्या मुरली मनोहर जोशी यांचे मातोश्रीशी जुने आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळेच जोशी यांच्या मातोश्री वारीमुळे शिवसेना – भाजपाच्या वाढत्या जवळीकतेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या मनात सध्या दिल्लीतील भाजपा नेते आणि राज्यातील भाजपा नेत्यांविषयी नाराजी आहे. त्यामुळेच भाजपाच्या पहिल्या फळीतील आणि जुने जाणते नेते मुरली मनोहर जोशी यांना मातोश्रीवर पाठवून उद्धव ठाकरे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेबरोबर युती व्हावी अशी भाजपाच्या नेत्यांची इच्छा असून त्या दिशेने भाजपाने सुरू केलेल्या प्रयत्नांचा हा भाग असल्याचे समजते.
COMMENTS