शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर उत्तम, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचं वक्तव्य!

शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर उत्तम, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचं वक्तव्य!

मुंबई – शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरुन भाजपसोबतची युती तोडून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. परंतु अशातच शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यान मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर उत्तम होईल, पण सध्या दोन्ही पक्ष त्या मानसिकतेत नसल्याचं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केलं आहे. मनोहर जोशी यांनी हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं आहे. परंतु त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

दरम्यान महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होऊन 13 दिवस झाले आहेत. परंतु अद्यापही खातेवाटप झालं नाही. त्यामुळे खातेवाटप कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. आज महाविकासआघाडीच्या नेत्यांनी खातेवाटपावर चर्चेसाठी बैठकीचं आयोजन केलं आहे.  संध्याकाळपर्यंत चर्चा संपून खातेवाटप निश्चित होईल, असंही महाविकासआघाडीच्या काही नेत्यांकडून सांगितलं जात आहे. खातेवाटपाचा हा तिढा अजून कायम आहे. परंतु अशातच मनोहर जोशी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

COMMENTS