मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना- भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील काही मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघातील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. नंदूरबारमध्ये भाजपकडून हिना गावीत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर याच मतदारसंघातून काँग्रेसकडून के सी पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील चित्र स्पष्ट झालं आहे.
दरम्यान धुळे मतदारसंघातून भाजपकडून सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून कुणाल पाटील हे मैदानात आहेत.तसेच
वर्धा मतदारसंघातून भाजपकडून रामदास तडस हे वयलोकसभेच्या.मैदानात आहेत. तर काँग्रेसकडून डॉ. चारुशीला टोकस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच नागपूरमधून भाजपकडून नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून नाना पटोले यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
गडचिरोली मतदारसंघातून भाजपकडून अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसकडून डॉ. नामदेव उसेंडी मैदानात आहेत. तसेच मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन यांच्याविरोधात काँग्रेसच्या प्रिया दत्त निवडणूक लढवणार आहेत.
तसेच अहमदनगरमधून भाजपकडून सुजय विखे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर बीड मतदारसंघातून भाजपच्या प्रीतम मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे बजरंग सोनावणे हे मैदानात आहेत.
COMMENTS