मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती अखेर ठरली इसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यापूर्वी शिवसेना-भाजप युतीचं 135-135 जागा लढवण्याचं सूत्र ठरल्याचं बोललं जात होतं.
तर 18 जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार होत्या. परंतु आता यामध्ये बदल करण्यात आला असून सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप 144, शिवसेना 126 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना आधीपासूनच 50-50 जागांच्या फॉर्म्युल्यावर ठाम होती. पण त्यामध्ये बदलही केले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान शिवसेना आणि भाजपने याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. याबाबतची घोषणा ते 29 तारखेला करणार असल्याची माहिती आहे. राज्यातील उमेदवार ठरवण्यासाठी भाजपच्या कोअर ग्रुपची दिल्लीत बैठक होत असून भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची या बैठकीला उपस्थिती आहे. या बैठकीतही युतीच्या जागावाटपाबाबत चर्चा केली जाणार असल्यामुळे बैठकीत काय निर्णय घेतला जाणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS