मुंबई – राज्य सरकारविरोधात भाजपनं एल्गार पुकारला असून राज्यभरात आंदोलन करणार असल्याची घोषणा भाजप नेत्यांनी केली आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आम्ही संपूर्ण जिल्ह्यात आणि तालुक्यात आंदोलन करणार असल्याचं भाजपच्या महिला उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 12 ऑक्टोंबररोजी महिलांचं आंदोलन होणार आहे. तर त्यानंतर 13 ऑक्टोबरला मंदिरं उघडण्यासाठी राज्यभरात आंदोलन केलं जाणार असल्याचं चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
तर मंदिर उघडण्यासाठी देखील आंदोलन करणार आहोत.शिर्डीमध्ये साई बाबा मंदिरा समोर हे आंदोल केलं जाणार असल्याचं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जाणार असून या आंदोलनात अनेक महंत आणि साधू उपस्थित राहणार असल्याचं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात प्रमुख मंदिर आहेत तिथे आंदोलन केले जाणार आहे. शिर्डीमध्ये स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील उपस्थित राहतील असंही ते म्हणाले आहेत.
हे ही वाचा…
आम्हाला ‘बिस्कीट’ नको, शिवसेनेचं निवडणूक आयोगाला पत्र!
आम्हाला 'बिस्कीट' नको, शिवसेनेचं निवडणूक आयोगाला पत्र! https://t.co/RWz7iVA9qW pic.twitter.com/Kk6QNNzy53
— Mahapolitics (@Mahapoliticsnew) October 10, 2020
साधूंची हत्या झाली तेंव्हा काँग्रेसची संवेदना कुठे लुप्त पावली होती – राम कदम VIDEOhttps://t.co/kIwvvNttEg pic.twitter.com/WBdfmRRMhd
— Mahapolitics (@Mahapoliticsnew) October 10, 2020
…तेव्हा संभाजी भिडेंनी आंदोलन केलं होतं, आता कुठे सापडत नाहीत – संजय राऊत https://t.co/tPs9OAfXp4 pic.twitter.com/mvfyusZPYK
— Mahapolitics (@Mahapoliticsnew) October 9, 2020
COMMENTS