मुंबईतील पोटनिवडणुकीत भाजपचा शिवसेनेला पाठिंबा !

मुंबईतील पोटनिवडणुकीत भाजपचा शिवसेनेला पाठिंबा !

मुंबई – मुंबईत घेण्यात येणा-या निवडणुकीला भाजपनं शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. याबाबतची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. सायन-प्रतीक्षानगर येथील प्रभाग क्रमांक १७३चे शिवसेनेचे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचं जानेवारी महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. त्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय भाजपानं घेतला असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली असून सायन-प्रतीक्षानगर पोटनिवडणुकीत शिवसेना जो उमेदवार ठरवेल त्यालाच पाठिंबा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचं आशीष शेलार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान विविध मुद्द्यांवरुन अनेकवेळा एकमेकांवर जाहीर टीका करणा-या शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा युती पहावयास मिळाली असल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. एवढच नाही तर आगामी निवडणुकीत भाजपची साथ सोडून स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. तरीही या पोटनिवडणूकीसाठी भाजपनं जाहीर पाठिंबा दर्शवल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS