भाजपने तिस-या यादीत 15 विद्यमान आमदारांची तिकीटे कापली, तिस-या यादीत 28 उमेदवार ! 

भाजपने तिस-या यादीत 15 विद्यमान आमदारांची तिकीटे कापली, तिस-या यादीत 28 उमेदवार ! 

सुरत / गांधीनगर – गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी 28 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. याआधी माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या जवळचे माजी महिला मंत्री वासु बेन त्रिवेदी आणि विद्यमान मंत्री नानू वानानी यांच्यासह 15 विद्यमान आमदारांचे तिकिट कापण्यात आले आहे. माजी विधानसभा अध्यक्ष आणि वरिष्ठ दलित नेते रमनलाल वोरा यांची इडर मतदारसंघातून  दसाडा आणि माजी अर्थमंत्री सौरभ पटेल अकोटवरुन मांडवी मतदारसंघामधून निवडणुक लढविणार आहे.  या यादीमध्ये 12 जणांना पक्षातील उमेदवारांना तिकीट मिळाले आहे. तर 9 आमदारांनाच पुन्हा तिकीट देण्यात आले आहे.

माजी मंत्री ताराचंद छेडा यांना या वेळी संधी मिळाली नाही. जामनगर दक्षिण मतदारसंघात पक्षाचे माजी अध्यक्ष आरसी फलदू यांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपने याआधी 70 आणि36 उमेदवारांची यादी जाहीर केल्या आहेत. आतापर्यंत तीन याद्यामध्ये  134 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अजून 48 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या 182 जागांसाठी 9 डिसेंबर व 14 डिसेंबर या दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होईल. मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसने रविवारी रात्री 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दोन्ही पक्षांना तिकीट वाटपाच्या दरम्यान अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे.

COMMENTS