नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे यापुढे भाजपची बदनामी कराल तर मार पडले अशी धमकी भाजपनं मल्याळम साहित्यिक पॉल झचारिया यांना दिली असल्याची माहिती आहे. पॉल यांनी एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे खुनी असल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांना भाजपाचे प्रदेश सचिव बी. गोपालकृष्णन यांनी धमकी दिली आहे. तुम्ही अशाचप्रकारे नरेंद्र मोदींची बदनामी करत राहिलात तर भाजपाचे कार्यकर्ते तुम्हाला मारतील, अशी धमकी गोपालकृष्णन यांनी दिली आहे .
दरम्यान पॉल झचारिया हे मल्याळम भाषेतील प्रसिद्ध लघुकथा आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी नुकत्याच पलक्कड येथे झालेल्या कार्यक्रमातील आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘खुनी’ असा केला होता. त्यानंतर त्यांना ही धमकी देण्यात आली असून झचरिया हे जातीयवादी लेखन करतात. मल्याळम साहित्याच्यादृष्टीने ते संकट असल्याचं गोपाळकृष्णन यांनी म्हटलं आहे.
COMMENTS