निवडणुकीपूर्वीच भाजपनं खातं उघडलं, तीन उमेदवार विजयी!

निवडणुकीपूर्वीच भाजपनं खातं उघडलं, तीन उमेदवार विजयी!

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीची  देशभरात धामधूम सुरु आहे. याचबरोबर काही राज्यामध्ये विधानसभेचीही निवडणूक पार पडणार आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूकही होत आहे. इथे लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या 60 जागा आहेत. सध्या भाजपचीच सत्ता असलेल्या अरुणाचल प्रदेशात 11 एप्रिल रोजी विधानसभा आणि लोकसभेसाठी मतदान होणार आहे. परंतु निवडणुकीपूर्वीच याठिकाणी विधानसभेतील भाजपचे तीन उमेदवार विजय झाले आहेत.

दरम्यान दोन विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे राज्यातील दिरांग मतदारसंघातून भाजपचा तिसराही उमेदवार विजयी झाल्याची माहिती आहे. यापूर्वी  सर केंटो जिनी आलो पूर्व विधानसभा मतदारसंघातून तर इंजिनीअर ताबा तेदिव हे  येचुली विधानसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपने निवडणुकीपूर्वीच खातं उघडलं असल्याचं दिसत आहे.

दरम्यान आलो पूर्व विधानसभेसाठी दोन उमेदवारांनी अर्ज भरला होता. छाननीनंतर काँग्रेसचे उमेदवार मिनकिर लोलेन यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. त्यामुळे केंटो जिनी यांचाच एकमेव वैध अर्ज आहे. त्यामुळे याठिकाणी ते बिनविरोध निवडून आले आहेत.

COMMENTS