अहमदनगर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगरमध्ये जाताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला धक्का दिला आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे रोहिदास आणि देवीदास कर्डिले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार सुजय विखेंसाठी हा धक्का मानला जात आहे. पक्षाचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी आज शरद पवार नगरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुतणे रोहिदास कर्डिले आणि देविदास कर्डिले यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. @PawarSpeaks साहेब आणि प्रदेशाध्यक्ष @Jayant_R_Patil यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.. #NCP2019 #LokSabhaElections2019 pic.twitter.com/4XiVyZzdEk
— NCP (@NCPspeaks) March 25, 2019
दरम्यान या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे याठिकाणी भाजपला जोरदार धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. रोहिदास आणि देवीदास हे शिवाजी कर्डिले यांचे बंधू आप्पासाहेब कर्डिले यांचे चिरंजीव आहेत. तर देवीदास बाणेर दूध संघाचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या जनसंपर्काचा फायदा राष्ट्रवादीला होण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप हे शिवाजी कर्डिलेंचे जावई आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS