नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या उदयनराजे भोसले यांना भाजपनं धक्का दिला असल्याचं दिसत आहे. कारण भाजपात जाण्यापूर्वी उदयनराजे यांनी काही महतत्त्वाच्या अटी ठेवल्या होत्या. त्यातली प्रमुख अट मान्य झालेली दिसत नाही.सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत व्हावी अशी प्रमुख अट उदयनराजेंनी घातली होती. मात्र ती अट आता पूर्ण होणार नसल्याचं दिसत आहे.
कारण आज केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेण्यात आली. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकाच्या तारखांची घोषणा केली. परंतु सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.त्यामुळे विधानसभा निवडणुकीसोबत आता सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होणार नसल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आणि निकाल लागल्यानंतरच आता सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होऊ शकते. त्यामुळे भाजपनं उदयनराजेंची पहिलीच अट अपूर्ण केली असल्याचं दिसत आहे.
COMMENTS